Sunday, November 27, 2022

🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........मी स्वतः

  🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........

🔹 प्रवीण कुबल यांच्याबद्दल थोडेसे ....

          अभ्यासूवृत्ती मानवाला ज्ञानाच्या शिखरावर नेते. यामुळे माणसाकडे शांती, संयम आणि व्यक्तिमत्व विकास करण्याची क्षमता येते. असेच अभ्यासू व्यक्तिमत्व, संघटनात्मक प्रचंड अनुभव, कुशल संघटक, समाजात विविध पद भुषविलेले, कार्यक्षम  समाजसेवक, शांत, संयमी पण परखड व्यक्तिमत्व, 

नाभिक समाजाची आन , बान , शान...  आपले सर्वांचे लाडके आधारस्तंभ, सत्यवादी मार्गदर्शक एक निस्वार्थी शिल्पकार 

सन्माननीय श्री. प्रवीण अशितोष कुबलसर .....

आपणांस वाढदिवसाच्या

मन:पुर्वक शुभेच्छा .....🌹

          शिक्षक कसा असावा ही प्रेरणा आपण समाजासाठी देऊन , भालचंद्र बाबांच्या कणकवली नगरीने आपणाला मोठे केले. किर्लोसचे गावचे भाग्यविधाते आणि गरीबांचा कल्पतरु. सन्माननिय श्री. प्रवीण अशितोष कुबल सर , आज आपला ४७ वा वाढदिवस. या जन्मदिनानिमित्त , आजपर्यंत तुम्ही केलेल्या जनसेवेबद्दल भरपुर  लिहीण्यासारखे आहे. परंतु वेळेअभावी तुमची प्रगती व जनसेवा थोडक्यात लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

          🔹माझ्या भावना आपल्या पर्यंत व्यक्त करण्यासाठी तशी वेळच आली नाही. परंतु या भावना , ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न..........

          तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, आव्हान म्हणून जगणारे आपण प्राविण्यशिल अरुणोदय आहात. अनंताच्या कृपेने,  मिळालेलं आयुष्य , म्हणजे आपल्यासाठी केवळ आनंद आणि मजा असं कधीच नव्हतं. आपल्यासाठी, आयुष्य म्हणजे येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्विकारणं आणि जिद्दीने त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य मानलात....

          आयुष्य म्हणजे संघर्ष  आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनात शिकलात. म्हणुनच संकट म्हणुन आलेल्या प्रसंगाला सामोरे गेलात. त्याचबरोबर  समाजाची सेवा करतांना भगवंताचा आशिर्वाद व तुमची प्रचंड इच्छाशक्ती (आत्मविश्वास) हाच तुमच्या जीवनात महत्वाचा ठरला. आपले संघर्षमय जीवन तुमच्या संसाराबरोबर , नाभिक बांधवांनाही फायदेशीर झाला. तुमचे विचार, अनमोल मार्गदर्शन समाज बांधवांना मिळत आहे. हे समाजाचे भाग्य आहे. तुम्ही नाभिक समाजाचे आधारस्तंभ बनलात. म्हणुनच आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे.

          आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ! हीच रामेश्वर व योगी भालचंद्र महाराज यांच्या चरणी  प्रार्थना. 🙏

  शुभेच्छुक :

🔸 पत्रकार गणेश चव्हाण , श्रावण ९४२००८४१२५

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...